शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

- जीवन जगायचं राहूनच गेलं

खंत होती मनात, जीवन जगायचं राहूनच गेलं
स्वच्छंदी आनंदी अन बेभान, जीवन जगायचं राहून च गेलं  

शाळा कॉलेज अन नौकरी च्या स्पर्धेत
पैसा मान आणि लौकिक कमावण्यात
जीवन जगायचं राहूनच गेलं

भूतकाळात रमण्यात  भविष्याची चिंता करण्यात
वर्तमानात  जगायचं विसरूनच गेलो
जीवन जगायचं राहूनच गेलं

शेवटी धीर करून विचारल, शेवटी धीर करून विचारलं
मी माझ्या मनाला काय झालं ? कसली खंत आहे तुला  ?
मनानं आगदी नाईलजन सांगितलं.....
विसरलास तू मला,खूप अंतर आहे आता आपल्या दोघात

कळून चुकल, कळून चुकल मनाच कधी ऐकलच नाही
यशापयशाच्या भीतीमुळे मनाला स्थान दिलेच नाही
मन बुद्धिच्या झगड्यात त्याच अस्थितव च राहिलं नाही

झालेली चूक सुधारुन  परत फुलतोय विचार  नवा  
झालेली चूक सुधारुन  परत फुलतोय विचार  नवा
नव्यानं स्वच्छंदी आनंदी अन बेभान, जीवन जगण्याचा....
नव्यानं स्वच्छंदी आनंदी अन बेभान, जीवन जगण्याचा....

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
#UKDiary 2015

गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५

- एकच पाऊस मला दोनदा भिजवून गेला....

एकच पाऊस मला दोनदा भिजवून गेला, एकच पाऊस मला दोनदा भिजवून गेला
एकदा या देहाला अन एकदा मनातील आठवणींना
एकच पाउस मला दोनदा भिजवून गेला.....


पाऊस धोधो आला अन नखिशकांत भिजवून गेला,पाऊस धोधो आला अन नखिशकांत भिजवून गेला
अन तसाच अलगद झिरपून मना पर्यंत  पोहचला
एकच पाउस मला दोनदा भिजवून गेला.....


पावसाचे गार टपोरे थेंब खूप आनंद देवून गेला,पावसाचे गार टपोरे थेंब खूप आनंद देवून गेला
अन हलकेच मनातील आठवणींना जागा करून  गेला
एकच पाउस मला दोनदा भिजवून गेला.....


आनंद, आश्रू अन आठवणींना एकच करून गेला, आनंद, आश्रू  अन आठवणींना एकच करून गेला
एकच पाउस मला दोनदा भिजवून गेला.....

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

- A FEAR

                                                                       
लहानपणा पासून सोबत असते या भीतीची बेमालूम पणे कळत नकळत ……. अगदी सुप्त आवस्थे पासून ते जीवनाच्या शेवटच्याक्षणा पर्यंत. अस्तिव टिकवण्याची धडपड, स्वतःनेच स्वतःला दिलेला सवधानतेचा  इशाराच  जणु . प्रत्येकाच्या जीवनात एक तरी क्षण येतो , या भीतीला ओलांडून पुढे जायचे का safe road select करायचा हे ठरवण्याचा. असा निर्णय प्रत्येकाच्या शक्ती , बुद्धी , मानसिकता आणि परिस्थिती वर अवलंबून असते पण बहुतांशी safe मार्गच स्विकारला जातो आणि एक संधी आपण च गमावून बसतो, यात गैर काहीच नाही पण ती वास्तवाची दुसरी बाजू असते. कदाचित कधी निर्णय चुकेलही पण Rejection / Insure / Failure ची भीती असते आणि ती स्वीकारण्याची तयारी नसते हेच  कादाचित मुळाशी कारण आसु  शकते.

बऱ्याच गोष्टी राहून जातात या भीती पोटी आणि नंतर चुटपट लागून राहते जन्मभर….  त्या वेळी जरा वेगळा निर्णय घेवु शकलो असतो तर …कितीतरी उदाहरण देता येतील carrier निवडी पासून ते स्वतःह चा Business  सुरु करण्यात , Relation  मध्ये, कंपनीत , मित्रांमध्ये असे असंख्य प्रसंग येतात आणि अशा मोक्याच्या वेळी मनाच्या खोल कप्यात दडून बसलेली भीती डोकं वर काढते आणि कशी आपल्याला operate करते हे काळात देखील नाही. इतर वेळी आपल्या Comfort zone मध्ये ह्याच भीतीचा मागमुस हि नसतो. याच आशयाचे एक सुंदर वाक्य वाचनात आले - Everything you want is on the other side of fear. आता 7 UP ची advertise आठवली असेल 'Kyunki Darr Ke Aage Jeet Hai'.

आता काही अंशी तुम्ही हि सहमत असाल अशा भीतीला आपण कधी ना कधी सामोरे गेलो, क्वचित प्रसंगी या भीती वर मत करून आव्हान स्वीकारही पण जाणीवपुर्वक दरवेळी या भीती वर मात करायची असेल तर step 1 - सावध राहणे , step 2 - आणि कदाचित अशी भीती आत्ता face करतो आहे हे accept करणे या दोन steps जमल्यावर  आपोआप च 3rd step सापडेल, मी ही प्रयत्न करतोय तुम्ही ही करा बघा जमतंय का ?


मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी