बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

आहे मी कोडयात..

सन २०११ ची कविता , काही कोडी सुटली काही आजून कोडी तशीच आहेत ..... 

आहे मी कोडयात जीवनाचा अर्थ उमगून घेण्यात ... 
            पाहिजे ते जिद्दी ने मिळवण्यात 
            का मिळवलेले सहजतेने त्याग करण्यात 
            आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

असेल कोणाची चूक ती दाखवून देण्यात 
का नुकसान सहन करून ही मोठ्या मनांन माफ करण्यात  
आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   
          
             सुख साठी पैसा की पैसा पायी सुख 
             पैसा आणि सुख यातील अंतर समजून घेण्यात 
             आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

सर्व काही सोडून संन्याशी होण्यात 
का या जगा मध्येच राहून ही अलिप्त राहण्यात
आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

                गोड गोड बोलून प्रसंगी स्वार्थ ही साधून घेण्यात 
                का तेजस्वी अभिमानाने जगण्यात 
               आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

एकटाच पुढे जाण्यात का
सावकाश का होईना सगळ्या ना बरोबर घेऊन जाण्यात 
आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

                 अत्ताचा क्षण साजरा करण्यात 
                 का माझ्यात ला मी शोधण्यात 
                 आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

उमगले असेल तुम्हाला हे कोडे 
तर समजावा मला ही ते थोडे
कारण आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात....

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी   

हे क्षितीजातील चांदण्या ...

आकाशातील चांदण्या पाहत aastana सुचलेली एक कविता - क्षितीजातील चांदण्या २०१०

हे क्षितीजातील चांदण्या 
दे भव्य विचार मला...

या नश्वरी जगतात ही 
चमकू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या 
दे भव्य विचार मला...

कोण मी कोण तू 
हे सत्य उमगू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या 
दे भव्य विचार मला

या मोहमयी जीवनात 
अलिप्तता दे मला
हे क्षितीजातील चांदण्या 
दे भव्य विचार मला...

सुख दुखः  चा ही पलीकडे 
जाऊ दे मला
का मधेच मी भरकटलो  हे समजू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या 
दे भव्य विचार मला...

याच जन्मी याच देही 
हो वो  शत जन्माचा सोहळा 
हे क्षितीजातील चांदण्या 
दे भव्य विचार मला...


मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी

मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला..

खूप जुनी कविता आहे , साधारण २०१० मध्ये जेंव्हा नवीन bike घेतली होती आणि नुकतीच भन्नाट चालवायला शिकलो होतो ....


मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....
आता मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला 

जीवनाच्या  वाटेवर जणू  वेगाशी स्पर्धा करायला 
आणि या स्पर्घेत ही जेता बनायला 
कारण  मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....

खचाखच Trafic मधून शिताफीनं निसटून पुढ जायला
तर कधी सुंदर मुलगी दिसली तर हळूच कट मारायला 
कारण  मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....

कधी दूर Ride मारायला 
मस्त पावसात गाडी वरून भिजायला 
डोंगर दर्या पालथे घालायला 
कारण  मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....

कधी कधी Trill अनुभवायला 
हात सोडून मजेत गाडी चालवायला 
खड्डे अडथळे चुकवत पुढे जायला 
कारण  मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी

(टीप- वरील गोष्टींचा लेखकाशी संबंध असेलच असे नाही )

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

शेरो शायरीं

एक बार वक्त ने घडी से कहां
      मेरे अलावा आप कुछ भी नही हो...
घडी ने मुसकुरते हुवे कहां
      वो तो शत प्रतिशत सच हैं
पर उनका क्या जिंहोने 
      हम दोंनो को एक हि समजा हैं...

बहोत ख्वाब सजाये थे ऐ जिंदगी..
        एसे हसके गुजारें गे |
हंसने कि बात तो छोड हि दों...
        ना कि तू वक्त भी दे राही है सोचने के लिये |

पाने से पहले हि...
       खोने का दर्द मेहंसूस किया हैं
अब पाना क्या और खोना क्या
       अब तो दोनो भी एक समान हैं...

पता नही था जिंदगी तू इतनी भी सक्त होगी 
       ना तू जीने देती  हैं , ना मरने देती हैं 
वो भी सुकून सें ।

बहोत होसला था ये जिंदगी तुझसे 
        कीं आने कल अच्छा होगा ।
पर इस कल के चक्कर मे 
        कल भी गया और आज भी गया ।।

कुछ ना कुछ , खोंने पानें कां सिलसिला 
        ज़िन्दगी में तों यूंही चलता रहेगा 
next lines are not yet out....:)


(Discrimination - वरील सर्व सुपीक डोक्यातून आलेल्या  सुपीक रचना आहेत , वास्तव्याशी याचा काहीही संबंध नाही 😉)


फुलपाखरु आणि मी


काल निवांत बसलो होतो खिडकीतून बाहेर पहात , अन अचानक पाऊस सुरु झाला.

आणि अचानक एक सुंदर फुलपाखरु बाहेरुन खिडकीच्या काचे वर येऊन बसलं , दोन एक क्षण गेले त्या सुंदर फुलपाखराला पाहत आणि मोह झालाच काचेवर का होइना अलगद हात लावून पाहण्याचा ..

कितीही आवडलं तरी फुलपाखरा धरायचा प्रयन्त करायचा नसतो कारण ते मुठीत येणं कधीच शक्य नसतं आणि अगदीच धरल तर त्या नाजूक फुलपाखराला इजा होण्याचीच शक्यता जास्त असते आणि मग आपल्या लालसे पायी असा प्रयन्त करताना ते उडुन गेल्याचं दुःख अधिक होतं.....

त्या पेक्षा त्या फुलपाखराला त्याच्या मर्जीन बसू द्यावं किंवा उडू द्यावं आणि शांत पणे  सुंदर, स्वछंदी फुलपाखराला पाहावं ,आपल्या पंखा वरची नाजूक नक्षी दाखवून मधेच पंख फडफडवून त्याचं वक्त होत असतानाच रूप न्यहाळावं. त्याच्यात आपला आणि त्या फुलपाखरा चा आनंद सामावला आहे. तो आनंद आपल्या हातात त्याला पडकण्या पेक्ष्या जास्त आहे तो घ्यावा अन समाधान मानावं.

कदाचित आपल्या आयुष्यात हि काही माणसं हि त्या फुलपाखरं सारखी असतात ना ........  



मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
#MunichDiary