लहानपणा पासून सोबत असते या भीतीची बेमालूम पणे कळत नकळत ……. अगदी सुप्त आवस्थे पासून ते जीवनाच्या शेवटच्याक्षणा पर्यंत. अस्तिव टिकवण्याची धडपड, स्वतःनेच स्वतःला दिलेला सवधानतेचा इशाराच जणु . प्रत्येकाच्या जीवनात एक तरी क्षण येतो , या भीतीला ओलांडून पुढे जायचे का safe road select करायचा हे ठरवण्याचा. असा निर्णय प्रत्येकाच्या शक्ती , बुद्धी , मानसिकता आणि परिस्थिती वर अवलंबून असते पण बहुतांशी safe मार्गच स्विकारला जातो आणि एक संधी आपण च गमावून बसतो, यात गैर काहीच नाही पण ती वास्तवाची दुसरी बाजू असते. कदाचित कधी निर्णय चुकेलही पण Rejection / Insure / Failure ची भीती असते आणि ती स्वीकारण्याची तयारी नसते हेच कादाचित मुळाशी कारण आसु शकते.
बऱ्याच गोष्टी राहून जातात या भीती पोटी आणि नंतर चुटपट लागून राहते जन्मभर…. त्या वेळी जरा वेगळा निर्णय घेवु शकलो असतो तर …कितीतरी उदाहरण देता येतील carrier निवडी पासून ते स्वतःह चा Business सुरु करण्यात , Relation मध्ये, कंपनीत , मित्रांमध्ये असे असंख्य प्रसंग येतात आणि अशा मोक्याच्या वेळी मनाच्या खोल कप्यात दडून बसलेली भीती डोकं वर काढते आणि कशी आपल्याला operate करते हे काळात देखील नाही. इतर वेळी आपल्या Comfort zone मध्ये ह्याच भीतीचा मागमुस हि नसतो. याच आशयाचे एक सुंदर वाक्य वाचनात आले - Everything you want is on the other side of fear. आता 7 UP ची advertise आठवली असेल 'Kyunki Darr Ke Aage Jeet Hai'.
आता काही अंशी तुम्ही हि सहमत असाल अशा भीतीला आपण कधी ना कधी सामोरे गेलो, क्वचित प्रसंगी या भीती वर मत करून आव्हान स्वीकारही पण जाणीवपुर्वक दरवेळी या भीती वर मात करायची असेल तर step 1 - सावध राहणे , step 2 - आणि कदाचित अशी भीती आत्ता face करतो आहे हे accept करणे या दोन steps जमल्यावर आपोआप च 3rd step सापडेल, मी ही प्रयत्न करतोय तुम्ही ही करा बघा जमतंय का ?
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा