शुक्रवार, ६ मे, २०१६

- पाहिली होती एक परी

पाहिली होती एक सुंदर परी 
नेहमीच मनाला भावणारी अन घायाळ करणारी …. 


 मोत्याच्या माळे सारखे सारखे सौन्दर्य जरी 
कधीच मनातील उमजुन न देणारी … 


आठवणी ने ही  बेभान करणारी 
अन हलकेच हसु फुलवणारी …. 


आपल्याच विश्वात नेहमी आसते जरी 
समजत कसे नाही वेड करून सोडलाय आपण कुणाला तरी …. 


तिच्याशी बोलायचे धाडस नव्हते जरी 
मनातले बिनधास्त सांगितले तरी …. 


काहीच न सांगताच निघून  गेली जरी 
निश्चितच येईल परत 
माझ्यासाठी अन फक्त माझ्यासाठी ….

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: