काल निवांत बसलो होतो खिडकीतून बाहेर पहात , अन अचानक पाऊस सुरु झाला.
आणि अचानक एक सुंदर फुलपाखरु बाहेरुन खिडकीच्या काचे वर येऊन बसलं , दोन एक क्षण गेले त्या सुंदर फुलपाखराला पाहत आणि मोह झालाच काचेवर का होइना अलगद हात लावून पाहण्याचा ..
कितीही आवडलं तरी फुलपाखरा धरायचा प्रयन्त करायचा नसतो कारण ते मुठीत येणं कधीच शक्य नसतं आणि अगदीच धरल तर त्या नाजूक फुलपाखराला इजा होण्याचीच शक्यता जास्त असते आणि मग आपल्या लालसे पायी असा प्रयन्त करताना ते उडुन गेल्याचं दुःख अधिक होतं.....
त्या पेक्षा त्या फुलपाखराला त्याच्या मर्जीन बसू द्यावं किंवा उडू द्यावं आणि शांत पणे सुंदर, स्वछंदी फुलपाखराला पाहावं ,आपल्या पंखा वरची नाजूक नक्षी दाखवून मधेच पंख फडफडवून त्याचं वक्त होत असतानाच रूप न्यहाळावं. त्याच्यात आपला आणि त्या फुलपाखरा चा आनंद सामावला आहे. तो आनंद आपल्या हातात त्याला पडकण्या पेक्ष्या जास्त आहे तो घ्यावा अन समाधान मानावं.
कदाचित आपल्या आयुष्यात हि काही माणसं हि त्या फुलपाखरं सारखी असतात ना ........
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
#MunichDiary
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा