बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

आहे मी कोडयात..

सन २०११ ची कविता , काही कोडी सुटली काही आजून कोडी तशीच आहेत ..... 

आहे मी कोडयात जीवनाचा अर्थ उमगून घेण्यात ... 
            पाहिजे ते जिद्दी ने मिळवण्यात 
            का मिळवलेले सहजतेने त्याग करण्यात 
            आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

असेल कोणाची चूक ती दाखवून देण्यात 
का नुकसान सहन करून ही मोठ्या मनांन माफ करण्यात  
आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   
          
             सुख साठी पैसा की पैसा पायी सुख 
             पैसा आणि सुख यातील अंतर समजून घेण्यात 
             आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

सर्व काही सोडून संन्याशी होण्यात 
का या जगा मध्येच राहून ही अलिप्त राहण्यात
आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

                गोड गोड बोलून प्रसंगी स्वार्थ ही साधून घेण्यात 
                का तेजस्वी अभिमानाने जगण्यात 
               आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

एकटाच पुढे जाण्यात का
सावकाश का होईना सगळ्या ना बरोबर घेऊन जाण्यात 
आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

                 अत्ताचा क्षण साजरा करण्यात 
                 का माझ्यात ला मी शोधण्यात 
                 आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात   

उमगले असेल तुम्हाला हे कोडे 
तर समजावा मला ही ते थोडे
कारण आहे मी कोडयात जीवनाचा हा अर्थ उमगून घेण्यात....

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: